मुंबई : मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला असून याप्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केलंय. ‘सामान्य माणसाचा जीव शिवसेनेने टांगणीला लावलाय. सायन रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जातात. तर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर रुग्णांचे डोळे करतडत आहेत. ही मुंबई आणि महापालिकेची आजची स्थिती आहे. 80 हजार कोटीचं फिक्स डीपॉझिट, 1 हजार 200 कोटीच्या वर आरोग्याचं बजेट, मग या बजेटला कोण कुरतडत आहे?,’ असा सवाल आशिष शेलार यांनी करतानाच मुंबई महापालिकेला शिवसेनेनं कुरतरडलं असल्याची बोचरी टीका देखील केली आहे.
काय आहे नक्की घटना ?
श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा तरुण अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत असताना हा प्रकार घडला आहे. तळमजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
रुग्णाची प्रकृती आधीच नाजूक आहे तसेच तो बेशुद्धावस्थेत आहे. असे असतानाच रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्रीनिवास याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचे नातेवाईकांना दिसले. उंदराने त्याचे डोळे कुरतडल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे तेथील नर्सला त्यांनी याबाबत सांगितले मात्र, संबंधित नर्सकडून उलट उत्तरे मिळाली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, ज्या आयसीयू रूममध्ये ही घटना घडली त्या तळमजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवास यांना उंदराने चावा घेतला असल्याचे दिसते आहे. याबाबत सुरक्षेचे उपाय करीत आहोत, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

