🕒 1 min read
मुंबई : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाच्या कोचची माहिती दिली आहे. राहुल द्रविड श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाचा प्रशिक्षक असणार आहे. मात्र राहुल द्रविडला श्रीलंका दौर्यासाठी प्रशिक्षक म्हणून नेमले जाऊ शकते अशा अनेक बातम्या आधीच समोर आल्या होत्या. भारतीय संघ श्रीलंकेत 13 ते 25 जुलै दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 मालिका खेळेणार आहे.
शिखर धवनकडे भारतीय टीमचं नेतृत्व असेल, तर राहुल द्रविड टीमचा प्रशिक्षक असेल. या दौऱ्यावर जाण्याआधी राहुल द्रविडने केलेली मागणी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने फेटाळून लावली आहे. राहुल द्रविडने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजआधी सराव सामन्याचं आयोजन करण्यात यावं, अशी मागणी केली होती, पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कोरोनाचं कारण देऊन सराव सामना खेळता येणार नाही, असं सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाने श्रीलंका ए विरुद्ध सराव सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
श्रीलंका बोर्डाने ही मागणी फेटाळल्यामुळे आता टीम इंडिया इन्ट्रा-स्क्वाड मॅच खेळणार असल्याचं वृत्त आहे, यामध्ये एक टी-20 आणि 2 वनडे असतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी भारताने इंग्लंडमध्ये इन्ट्रा स्क्वाड मॅच खेळली. भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल.
श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाबरप्रेमी पप्पू व पप्पूच्या मम्मीला खूश करण्यासाठी मंदिर उभारणीची बदनामी’
- नियमावलीवरून मोदी सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात पहिला गुन्हा युपीत दाखल
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, लवकरच कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
