Share

महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्याचार करणारा गजाआड, अंधेरी पोलिसांची औरंगाबादेत कारवाई

Published On: 

औरंंगाबाद : पतीपासून फारकत घेतल्यानंतर मेट्रो मेनिया या वेबसाईटवर नव्याने जोडीदार शोधणा-या मुंबईतील महिला सहायक पोलीस निरीक्षकावर अत्याचार केलेल्या बँक कर्मचा-याला मंगळवारी अंधेरी पोलिसांनी धूत हॉस्पीटलसमोरील म्हाडा कॉलनीतून ताब्यात घेतले. संदीप भरतराव ठाकुर (वय ३८, रा. श्रध्दा कॉलनी, म्हाडा कॉलनी, ताजनापूर) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे स्वत:ची फारकत होण्यापुर्वीच त्याने मेट्रो मेनिया या वेबसाईटवर गेल्या दिड वर्षांपूर्वी सहायक पोलिस निरीक्षक महिलेशी ओळख करुन घेतली होती. त्यानंतर त्याने गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुंबईतील एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाची पतीसोबत फारकत झालेली आहे. त्यामुळे नवीन जोडीदार शोधण्यासाठी पीडीताने मेट्रो मेनिया या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले होते. तर दुसरीकडे औरंगाबादेतील एका बँकेत कामाला असलेल्या संदीप ठाकुर याने पत्नीशी फारकत होण्यापुर्वीच मेट्रो मेनियावर रजिस्ट्रेशन केले. त्यातून पीडीतेची संदीप ठाकुरसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या मोबाइल क्रमांकाची अदलाबदली केली. पुढे संदीप ठाकुर आणि पीडीता एकमेकांना पवई भागात भेटले.

त्यावेळी संदीप ठाकुर याने पीडीतेला शितपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एका ठिकाणी अत्याचार केला. तसेच पीडितेच्या भावी पतीला पीडितेसोबत केलेल्या शारीरिक संबंधचा व्हिडीओ पाठवून पिडीतेचा विवाह मोडला होता. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिस ठाण्यात संदीप ठाकूरसह त्याला मदत करणाऱ्या दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधेरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय आचरेकर, पोलीस नाईक सोनवणे, गोसावी व वरे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुख्य आरोपी संदीप ठाकुर याला श्रध्दा कॉलनीतून अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सातवसे या करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!