Share

गाजावाजा करुन सुरू केलेल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला अत्यल्प प्रतिसाद, केवळ १३० नागरिकांचे लसीकरण

Published On: 

औरंगाबाद : मुंबई-पुणे पाठोपाठ औरंगाबादेतही ७ जूनपासून ड्राइव्ह इन लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रोझोन मॉलची पार्किंग या मोहीमेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याठिकाणी ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला अथवा दुसरा डोस देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास १३० नागरिकांनी कारमध्ये येऊन लस टोचून घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

मात्र अतिशय उत्साहात सुरु करण्यात आलेल्या या मोहीमेस गेल्या नऊ दिवसात अतिशय कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात नागरिकांच्या प्रतिसादानुसार मोहिमेचा कालावधी ठरविण्यात येईल. असेही मनपाने स्पष्ट केले. लसीकरणाला प्रतिसाद मिळावा, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर ताटकळत थांबावे लागू नये यासाठी मनपाने ड्राईव्ह इन ही संकल्पना राबविण्याचे ठरवले. त्यानुसार कारमधून आलेल्या नागरिकांना कारमध्येच लस टोचली जात आहे. इतर चार चाकी वाहनांमधून आलेल्या तसेच रिक्षांमधून आलेल्या नागरिकांनाही लस देण्यात येत आहे.

नागरिक आपल्या वाहनाने या ठिकाणी लसीकरणासाठी येत आहेत. वाहनात बसूनच त्यांना लस टोचण्यात येत आहे. यासाठी प्रोझोनने सहकार्य केले आहे. एपीआय कॉर्नर जवळील प्रोझोन मॉलच्या दोन्ही पार्किंग लसीकरणाच्या ड्राइव्ह इन साठी वापरण्यात येत आहे. पार्किंग मध्ये लस घेतलेल्या नागरिकांना अर्धा तास थांबवले जात आहे. सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरुच राहणार

७ जूनपासून ड्राइव्ह इन लसीकरण मोहिम आपण सुरु केली आहे. मात्र गेल्या ९ दिवसात फक्त १३० नागरिकांनी याचा फायदा घेत आपल्या वाहनाने येत लसीकरण करून घेतले आहे. मात्र तात्काळ ही मोहिम बंद करण्यात येणार नाही. आणखी काही दिवस कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो हे आपण पाहणार आहोत. अशी प्रतिक्रिया आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!