🕒 1 min read
नवी मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहिल्यामुळे धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
‘देशाला वेगवान पद्धतीचे लसीकरण गरजेचे असून संपूर्ण देशाचे लसीकरण शक्य तितक्या लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे, या बाबतीत लोकांना आता भाजपचे खोटे दावे, भंपक घोषणा आणि लबाडी नको आहेत.’ अशा प्रकारची घणाघाती टीका त्यांनी ट्वीटर च्या माध्यमातून केली आहे. पंतप्रधानांची खोटी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून वारंवार केला जात आहे, पण याच नादात करोनाचा मोठा प्रादुर्भाव देशात निर्माण झाला आणि असंख्य लोकांचे यात प्राण गेले असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने कोविशिल्ड डोसमधील अंतर स्वत:च्या मनानेच वाढवले असल्याची एक बातमी प्रसारित झाली आहे त्याचा दाखलाही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिला आहे.
दरम्यान आता कोरोनावर उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. 2-DG असं या औषधाचं नाव आहे. DRDO च्या इंन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन एंड अलाईड सायन्सेसने तयार केलेलं हे औषध पूर्णत: भारतीय बनावटीचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ ?’ चित्रा वाघ संतापल्या
- ज्याने विश्वास ठेवला, त्याचाच घात केला; कर्ज फेडण्यासाठी सोने व्यापाऱ्याला कारागिराचा ४० लाखांचा गंडा
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘औरंगाबाद ग्रामीणलाही तीन मधून लेव्हल एक मध्ये आणण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा’
- गाफीलपणा टाळा…पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत आजही वाढ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
