मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन आता राज्यात शिवसेना, काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे. ‘बाबरप्रेमी पप्पू व पप्पूच्या मम्मीला खूश करण्यासाठी मंदिर उभारणीची बदनामी सुरू असल्याचा आरोप भातखळकर यांनी केलाय.
‘वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावे’. असे ट्विट भातखळकर यांनी केलेय.
वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे.
बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
त्यापूर्वी आमदार अतुल भातखळकर यांनी बातमी ट्वीट करुन शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना, आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावलाय.
‘सामना’च्या अग्रलेखामुळे शिवसेना-भाजपमध्ये सामना
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला. भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाल्याचं पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसची असेल तर शिवसेनेचीही स्वबळाची तयारी’, मंत्री अब्दूल सत्तार यांचा निर्धार
- नियमावलीवरून मोदी सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात पहिला गुन्हा युपीत दाखल
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, लवकरच कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

