Share

खतांच्या किंमती कमी करुन शेतकर्‍यांपुढील आर्थिक संकट थांबवा, आपची मागणी!

Published On: 

औरंगाबाद : खतांच्या भरमसाठ किंमती वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकरी वर्ग मशागतीच्या कामाला लागला आहे. पण केंद्र सरकारने खतांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. एकीकडे शेतमालाच्या किंमती घसरल्या असतांना खतांच्या किमती वाढल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे खतांच्या किंमती कमी करुन शेतकर्‍यांच्या पुढे असलेले आर्थिक संकट थांबवावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

भारतातील सर्वात मोठ्या खत उत्पादक इफको कंपनीने खताच्या किंमती जवळपास ५५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मागच्याच महिन्यात याबाबत इफको व केंद्र सरकारने खुलासा करत ही भाववाढ होणार नसल्याचे सांगितले होते. मग एका महिन्यात चक्रे उलटी का फिरली? असा सवाल आपचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊन काळात गतवर्षी शेतकरी विरोधी बिले आणली.

त्याविरोधात शेतकरी जवळपास पाच महिने आंदोलन करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करुन खतांची दरवाढ केली आहे. मोठ्या भांडवलदारांच्या हातात शेती देण्याचा डाव असल्याचा आरोप आपने केला आहे. महामारी, त्यातच पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा फटका बसलेला असताना वाढवलेल्या खतांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी विभागीय आयुक्तांमार्फत पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, शहर उपाध्यक्ष वैजनाथ राठोड आणि मध्य विधानसभा सदस्य मजाज खान उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!