Share

नमस्कार, अजित पवार बोलतोय; दिव्यांग चित्रकाराचं अजितदादांनी केलं फोनवरून कौतुक !

Published On: 

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. अजित पवार हे राजकीय क्षेत्रात स्पष्टवक्ते व वेळेची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात त्यांचे अनेक समर्थक देखील आहेत. अशाच त्यांच्या दिव्यांग चित्रकार असलेल्या समर्थकाने त्यांचे पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटले.

ही सुंदर कलाकृती बघून कोरोना, चक्रीवादळ अशा संकटाच्या कामातून वेळ काढून अजित पवार यांनी बार्शी तालुक्यातील जामगावमधील युवक चित्रकार महेश मस्के याचं कौतुक केलं आहे. लॉकडाऊनमध्ये इतर काम बंद अशात घरातून बाहेरही पडता येत नाही. चित्र रेखाटण्याचा छंद मात्र पेन्सिल चित्रासाठी लागणारे साहित्य नाही. अशात महेशने पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटून आपली कला जोपासली आहे.

त्याने, अभिनेता सोनू सूद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे चित्र रेखाटले आहे. ओळखीच्या व्यक्तीद्वारे त्याने अजित पवार यांच्या घरातील क्रमांक व पत्ता घेऊन पहिल्यांदा त्याने सुनेत्रा पवार यांचे चित्र बारामतीला पाठवले होते. यावेळी, सुनेत्रा पवार यांनी महेशचे कौतुक केले व नंबर देखील सेव्ह केला.

यानंतर, महेश मस्के याने पिंपळाच्या पानावर रेखाटलेलं अजित पवार याचं चित्र देखील बारामतीला पाठवलं. सुनेत्रा पवार यांनी हे चित्र अजित पवार यांना दाखवलं व त्यांच्यात चर्चा झाली. यानंतर, अजित पवार यांनी स्वतः महेश मस्के यांना फोन करून त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, कोरोनच संकट कमी झाल्यानंतर प्रत्यक्षात भेटू असं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!