Share

खाम नदी काठावर होणार एक लाख वृक्षांची लागवड, औरंगाबाद बनणार ‘ऑक्सिजन हब’!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने खाम नदी पुनरुज्जीवनाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून हाती घेतले आहे. दरम्यान, शनिवारी (दि.२२) महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना खामनदीच्या परिसराची पाहणी केली. कामे वेळेत पूर्ण करा, नाल्यांवर जाळ्या बसवणे, बंधार्‍यांची उंची वाढवून खाम नदीच्या काठावर एक लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले.

खाम नदी विकास प्रकल्पाचे मागील तीन महिन्यापासून सुरू आहे. अलीकडे विकासकामाला गती आली आहे. यापुढील टप्प्यात खाम नदीवर एक लाख वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. नाल्यावर जाळ्या बसविण्यात येणार आहेत. बंधार्‍याची उंची वाढवली जाणार आहे. तसेच नदीच्या काठावर असलेल्या घोड्यांचे तबेले नदीच्या बाजूला उघडे असल्याने ते बंद करून नाल्यात कचरा टाकल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच विविध कामे वेळेत पूर्ण करावी. अशा पांडेय यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी लोखंडी पूल ते बारापुल्ला पर्यंत खाम नदीचा सर्व परिसर फिरून नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, पिचिंग व बंधार्‍याच्या कामाची पाहणी केली. स्वतः नदीतील कचरा काढला. नदीत कचरा टाकणार्‍या व सांडपाणी सोडणार्‍या नागरिकांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, जिल्हा उत्खनन अधिकारी अतुल दोड, पालिकेचे कचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, इको सत्वच्या नताशा झरीन, आदित्य तिवारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदउल्ला खान आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!