Share

छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले खा.जलील, ‘व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्या, अन्यथा..’

Published On: 

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात प्रशासन मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहेरबानी करत आहे, तर छोट्या व्यापाऱ्यांना मात्र दंड ठोठावत आहे. शनिवारी गुलमंडीत मिलन मिठाई भांडारचे सील दोन तासांत काढण्यात आले. मात्र, इतर गरीब व छोट्या व्यापाऱ्यांना दंड ठोठावणे, दुकाने सील करण्याची बळजबरी का केली जात आहे. प्रशासनाने छोट्या दुकानांचे सील उघडले नाही तर गरीब छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने मी स्वत: उघडायला येईल’, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

ते म्हणाले, ‘छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानांचे सील काढण्याचे निवेदन आमदार प्रदीप जैस्वाल व मी जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु काही राजकीय नेत्यांनी दुकान उघडण्यास विरोध केला. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. बँकेचे हप्ते फेडू न शकल्याने एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. ही गंभीर बाब आहे. खासगी बँका गुंडांकरवी कर्जाचे हप्ते बळजबरीने वसूल करू लागले आहेत.

अशा रिकव्हरी एजंटांनी त्रास दिल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, आम्ही त्यांचा बंदाेबस्त करु, असे आवाहनही त्यांनी व्यावसायिक वाहनचालक, मालकांना केले. या कर्जावरील व्याज माफ करावे, व्यापाऱ्यांचे लाइट बिल माफ करा आदी मागण्याही खासदारांनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!