🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळा पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपला लक्ष्य केलं होतं. संभाजीराजे हे आता आक्रमक झाले असून येत्या २७ तारखेला ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी संभाजीराजेंच्या नाराजीवर भाष्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांची भेट का नाही झाली ? याच कारण देखील स्पष्ट केलं आहे. ‘मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजेंशी भेट होऊ शकली नाही,’ असं विधान माध्यमांशी बोलताना केलं आहे.
मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत
१ मोदींची विषयांची समज फार कमी आहे.
२. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही.
३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे. https://t.co/adZNnj0q9J— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 24, 2021
आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत – १. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. २. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. ३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे,’ असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उजनीच्या पाण्यावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे, पंढरपूर सातारा महामार्गावर टायर जाळत आंदोलन
- छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले खा.जलील, ‘व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्या, अन्यथा..’
- पत्रकार गिरीश कुबेरांचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात ; अनेक संघटनांसह राजकीय पक्ष आक्रमक
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- नमस्कार, अजित पवार बोलतोय; दिव्यांग चित्रकाराचं अजितदादांनी केलं फोनवरून कौतुक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

