Share

उजनीच्या पाण्यावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे, पंढरपूर सातारा महामार्गावर टायर जाळत आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर – उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी रद्द झाल्याचे सांगितल्यानंतरही उजनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री सही करून हा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत जिल्हाभर आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.उजनी धरण पाणी बचओ संघर्ष समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहीनिशी लवकरात लवकर हा आदेश काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.

समितीच्या सदस्यांकडून रविवारी पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील उपरी गावातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खुपसे, माऊली हाळनवर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन केलं. आंदोलकांनी पंढरपूर-सातारा रस्ता अडवला होता. या मार्गावर टायर जाळत आंदोलकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

इंदापूरसाठी मंजूर केलेले पाणी रद्द करावे, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी दिला आहे. हे आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळं मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. जवळपास दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!