Share

‘शेतकऱ्यांची दिशाभूल करणे थांबवा, आमच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतः नीट अभ्यास करा’

Published On: 

जळगाव – जळगाव जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे. या दोन्ही तालुक्यातील केळीच्या बागा वादळामुळे अक्षरश: उद्धवस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या जुन्या निकषानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.

पीक विम्याचे निकष ठरवणे, त्यानंतर टेंडर काढणे हे काम सर्वस्वी राज्य सरकारचे आहे. किमान आता तरी शेतकऱ्यांची दिशाभूल करणे थांबवा. ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची आहे. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतः नीट अभ्यास करा, अशा शब्दांत रक्षा खडसेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

पीक विम्याच्या विषयात केंद्र सरकार फक्त राज्य सरकारला पैसे देण्याचे काम करते. पीक विमा योजनेचे निकष ठरवणे, त्यानंतर टेंडर काढणे हे राज्य सरकारचे काम आहे. मागच्या वर्षी चुकीच्या पद्धतीने निकष ठरवले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी लाभ मिळणार नाही.कापसाचा विमाही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही, असेही खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करायला हवी. भाजपा सरकारच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नव्हता, त्यांना 50 टक्के मदत केली जात होती. त्याच धर्तीवर आता शेतकऱ्यांना मदत करायला हवी. कोकणात ज्या प्रमाणे सरसकट मदत केली, तशीच मदत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही व्हावी, अशी मागणी देखील रक्षा खडसेंनी केली.दरम्यान, रक्षा खडसे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेला आता राज्यसरकार कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!