परभणी : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस ते काल जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या जळगावच्या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी ते भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटले.
दरम्यान, फडणवीसांच्या भेटीगाठींवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?’ असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
आता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. ‘ संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?’ अशा शब्दांत फडणवीसांनी राऊतांचा समाचार घेतला. तसेच, ‘मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही जाणं बंद नाही केलं,’ असं विधान देखील फडणवीसांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एकवेळ केंद्रातलं सरकार पडेल पण महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही; पटोलेंच फडणवीसांना प्रत्युत्तर
- कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही; शिवसेनेचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- दिलासादायक! राज्यात आज ३५,९४९ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

