Share

पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये; आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार – पडळकर

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यावरून मागासवर्ग तीव्र नाराज झाला असून विरोधकांसह काँग्रेसने देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा हायकोर्टाचा निर्णय अखेर कायम ठेवला आहे. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण आता संपुष्टात आलं आहे.

आरक्षण रद्द होत असल्याने मराठा समाजासह ओबीसी व सर्वच मागासवर्ग हा तीव्र नाराज असून हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच जबाबदार असल्याची टीका केली आहे.

‘महाविकास आघाडी सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. हे सर्व शरद पवारांच्या नेतृत्वात सुरु आहे. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही.’ असा घणाघात पडळकरांनी केलाय.

पुढे ते म्हणाले, ‘मराठा, ओबीसी आणि पदोन्नती आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे, असा आरोप देखील गोपीचंद पडकर यांनी केला असून आता या सरकारविरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!