मुंबई : सीबीएसई पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्री परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने असल्याचं सांगण्यात येत आहे. शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे पाठवला आहे. आता एक दोन दिवसात त्याबाबत चर्चा होऊन, निर्णय होईल असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने राज्यातील बोर्डांच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ‘कोरोना, पाऊस आदी बाबींवर विचार करण्यात आला. केंद्राला प्रस्ताव दिला होता. त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रस्ताव दिला आहे त्यांच्याकडून उत्तर आले की आम्ही त्यावर निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे आहे.’ असे त्या यावेळी म्हणाले आहेत.
बारावीची परीक्षा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप केले आहेत. राज्य सरकार परीक्षा घेण्याविरोधात होते. तर भाजपाचे नेते विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असा हेका धरून परीक्षा घेण्यासाठी आग्रही होते. मात्र, केंद्र सरकारनेच सीबीएसईची परीक्षा रद्द केल्याने आता राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मातोश्रीने दरवाजे बंद केले, आम्ही जाणं बंद नाही केलं; फडणवीसांचा राऊतांवर पलटवार
- कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही; शिवसेनेचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- दिलासादायक! राज्यात आज ३५,९४९ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

