Share

“दुसरा कपिल देव शोधणे बंद करा”, गंभीरचा भारतीय संघाला सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघ घरच्या आणि घराबाहेरील कोणत्याही फॉर्मेटमध्ये खेळताना सर्वात मजबूत संघ बनला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांच्या नेतृत्वाखाली संघाची फलंदाजी मजबूत आहे. वेगवान गोलंदाजी विभागाही चांगली कामगिरी करत आहे. तर भारतीय फिरकीपटू अजूनही बहुतांश सामन्यांमध्ये कायमस्वरूपी प्रभाव पाडत आहेत. मात्र भारतीय संघ अजूनही अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इरफान पठाण, हार्दिक पंड्या सारखे अष्टपैलू खेळाडू संघात होते. पण ते शीर्षस्थानी टिकून राहू शकले नाहीत.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडूच्या कमतरतेबाबत बोलताना भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने वक्तव्य केले आहे. तो म्हणाला ” कपिल देवनंतर कोणीही अष्टपैलू खेळाडू मिळत नसल्याबद्दल आपण बोलत राहतो. ते खरे आहे. त्यामुळे ही सत्यता स्वीकारा आणि रणजी ट्रॉफीमध्ये लोकांना विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि एकदा ते तयार झाले कि त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायची संधी द्या,”

गंभीरने यावेळी बीसीसीआयला हि लक्ष केले आहे.. तो पुढे म्हणाला “तुमच्याकडे जे काही नसेल, त्याकडे जाऊ नका. ते स्वीकारून पुढे जा . तुम्ही जे तयार करू शकत नाही ते बनवण्याचा प्रयत्न करू नका; समस्या तिथेच आहे. मला वाटते  की आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे एखाद्याला तयार करण्यासाठी नसते. ग्रूमिंग हे देशांतर्गत आणि भारत “अ” लेव्हलमध्ये होते. जेव्हा तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करता तेव्हा तुम्ही तेथे जाण्यासाठी आणि थेट कामगिरी करण्यास तयार असले पाहिजे,”

अष्टपैलू खेळाडूचा स्‍लॉट भरण्‍यासाठी भारतीय संघ हार्दिक पंड्यावर खूप अवलंबून होता. परंतु २०१९ मध्ये त्याच्या पाठीवरची शस्त्रक्रिया झाल्यापासून तो केवळ फलंदाजी करत आहे. मात्र भारतीय संघ अजूनही मिडल ऑर्डरमध्ये एक विश्वसनीय अष्टपैलू खेळाडूच्या शोधात दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!