मुंबई: भाजपच्या दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांग, आम्ही कुणाला सांगणार नाही, आता अशा पद्धतीच्या चर्चा बंद करा, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. आता प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
पाटील म्हणाले, कालपरवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण दिला. आदल्या दिवशी ९ वाजता एका व्हिडीओ कॉलवर आपण हा कार्यक्रम दिला. दुसऱ्या दिवशी २६-२७ मोठ्या शहरात आपण नवाब मलिकांचे पुतळे जाळले त्याच सोबत इंधनावरील व्हॅट कमी करावा म्हणून आपण कार्यक्रम दिला. ४०० हून अधिक जिल्हा केंद्र आणि तहसील केंद्रांवर निदर्शने करण्यात आली, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
एसटीच्या आंदोलनात सर्व एसटी कामगारांच्या संघटना बरखास्त झाल्या. त्याचं नेतृत्व भाजपकडे आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे आपले दोन नेते एसटी कामगारांच्या आंदोलनात आहेत. आता याच पद्धतीने प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपण काम करायचे आहे, असं ते यावेळी म्हणाले. काम आधी पासूनच सुरू केले आहे मात्र आता सत्ता कधी येणार, अशी विचारणा करत न बसता थेट कमाल लागा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारला काळे झेंडे दाखवून निदर्शने
- शिवसेनेनं सत्तेसाठी ‘हिंदुत्ववादी’ भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये- प्रविण दरेकर
- अंबाला तुरुंगातून आणलेल्या मातीने हिंदू महासभा उभारणार नथुराम गोडसेचा पुतळा
- ‘आंदोलनाचा आज सातवा दिवस, या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार?’
- ठाकरे सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय जारी; मानधनातही वाढ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

