मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथून हालणार नाही. असा पावित्रा सदाभाऊ व पडळकरांनी घेतला आहे. याबाबत गोपीचंड पडळकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदानावर #एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.@BJP4Maharashtra @Sadabhau_khot @maheshklandge pic.twitter.com/m8mD6OYv3u
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) November 16, 2021
गोपीचंद पडळकर म्हणाले, आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण सोडता इतर मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठीच राज्य सरकारने एक समिती देखील नेमली आहे, मात्र या समितीवर एसटी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. या समितीवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी, अशी विनंती संघटनांनी उच्च न्यायालयात सोमवारी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी पटोलेंनी ‘ते’ वक्तव्य केले-संजय कुटे
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला


