Share

अंबाला तुरुंगातून आणलेल्या मातीने हिंदू महासभा उभारणार नथुराम गोडसेचा पुतळा

Published On: 

हरियाणा : सोमवारी(१५ नोव्हें.)नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू महासभेने हरियाणाच्या अंबाला सेंट्रल जेलमधून आणलेल्या मातीने नथुराम गोडसेचा पुतळा बनवणार असल्याची घोषणा केली आहे. या सेंट्रल जेलमध्ये महात्मा गांधींच्या मारेकरी गोडसेला १९४९ मध्ये फाशी देण्यात आली होती.

यासंदर्भात बोलतांना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी सांगितले की,’ज्या अंबाला तुरुंगात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली होती, त्या तुरुंगातून हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात माती आणली आहे. तसेच या मातीचा वापर गोडसे आणि आपटे यांचे पुतळे बनवण्यासाठी केला जाईल आणि ते ग्वाल्हेर येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात बसवले जातील’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’महासभेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील ‘बलिदान धाम’ येथे गोडसे आणि आपटे यांचे पुतळे बसवले. आम्ही प्रत्येक राज्यात असे बलिदान धाम बांधू.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!