Share

साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक; भाजपच्या कार्यकर्त्यांवर शिंदेंचा आरोप

Published On: 

सातारा : राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत कार्यालयाच्या खिडकीच्या काचांचे नुकसान झाले आहे. या दगडफेकीनंतर आरोपी पसार झाले आहेत. तर, दगडफेकीमागचं कारण अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यासह त्यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची परिस्थिती असताना काहीजण महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शिंदे म्हणाले आहेत.

‘भाजपची काही मंडळी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रकार सातारामध्ये झाला. साताऱ्यात काही व्यक्ती आल्या त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राज्यमंत्र्यांच्या घराबाहेर दगडफेक केली. ही नावं पोलिसांना कळालेली आहेत. त्या व्यक्ती कोणत्या पक्षाचं काम करतात, कोणत्या संघाचं काम करतात, कोणत्या आमदाराचं काम करतात हे सुद्धा कळलेलं आहे. माझी पोलिसांनी आरोपींना 24 तासात अटक करावी, ही विनंती आहे. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. मात्र खालच्या पातळीवर राजकारण केलं जातेय हे दुर्दैव आहे,’ अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!