नांदेड: कोरोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस होत असल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असल्याने ग्रामीण भागातून देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २२६८ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १८११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४२२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ४,७१२ जण उपचार घेत असून त्यापैकी २०३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात ॲन्टीजेन किटचा तुटवडा आहे. ॲन्टीजेन किटचा तुटवडा असल्याने साहजिकच तपासणीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बाधीतांचे प्रमाणही कमी झाले आहे. असे असले तरीही लॉकडाऊनमुळेच हे घडल्याचा पोकळ दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. शहर व जिल्ह्यात लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे १२ जण मरण पावले. त्यामध्ये नांदेड शहरातील भावसार चौकातील ६३ वर्षीय पुरूष, कंधारमधील ८५ वर्षीय महिला, लोह्यातील ७० वर्षीय महिला, किनवट तालुक्यातील अंबाडी येथील ७० वर्षीय पुरूष, भोकर तालुक्यातील बेंद्री येथील ५५ वर्षीय पुरूष, धर्माबाद येथील ३८ वर्षीय तरूण, हदगाव मधील ४८ वर्षीय पुरूष, नायगाव मधील ५० वर्षीय पुरूष, देगलूर तालुक्यातील किनी येथील ७८ वर्षीय महिला, येरगी येथील ६० वर्षीय पुरूष, लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथील ७८ वर्षीय पुरूष, हदगाव तालुक्यातील रुई येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ४,७३,०६० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३, ८०,३३८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ८२,८९८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के झाले आहे. सध्या जिल्ह्यात ७४१२ जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून त्यातील २०३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- तिसरी लाट कोरोनाची नाही, मराठ्यांची असेल; नितेश राणेंची गर्जना !
- इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस
- ‘मराठा समाजाची खिल्ली उडविणाऱ्या राऊतला मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार काय?’
- लॉकडाऊन संपताच १६ तारखेपासून मराठा समाज आक्रमक; पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं !
- अरिजीत सिंगची आई रुग्णालयात; A-रक्ताची तातडीने गरज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

