पुणे : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार संजय काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले काही दिवस राजकीय घडामोडीपासून दूर असणारे काकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त भाजपमध्ये पुन्हा सक्रिय होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या निवडीनंतर फेसबुक पोस्टच्या माध्यामतून काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचा मला आनंद आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
काकडे पुढे म्हणाले, आजवर प्रत्येकवेळी मी पक्षाच्या भल्यासाठी काम करत आलो. पक्षाने जी जबाबदारी मला दिली ती इमानदारीने पार पाडली. देशात, राज्यात व पुणे शहरात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे. आणि यापुढील काळात पक्षाच्या हितासाठी आणि पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकवर राहण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आणि थेंब उपयोगी पडेल, हा शब्द मी यानिमित्ताने देतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा समाजाची खिल्ली उडविणाऱ्या राऊतला मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार काय?’
- मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे – खेडेकर
- ‘मराठा समाजाने कोणाच्या दबावाला अथवा दिशाभूल करणाऱ्यांच्या वक्तव्यांना बळी पडू नये’
- ‘मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवावा’
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

