Share

औरंगाबादेत दोन दिवसांआड पाणी देता येईल का?, मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात चर्चा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत शहरातील सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे ऑडिट करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले आहे.

जायकवाडीहून औरंगाबाद शहरात नेमके पाणी किती येते, शहरात कोणत्या भागात पाणी कमी पडते, पाण्याची गळती होते का, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने नेमके काय करता येईल? या संदर्भात ऑडिट करण्याचे आदेश पांडेय यांनी दिल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराच्या पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने आयुक्त पांडेय यांनी पालिकेसह एमजेपी अधिकार्‍यांची नुकतीच संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला एमजेपीचे अधिक्षक अभियंता अजयसिंह देखील उपस्थित होते. पाण्याच्या ऑडिटचे काम एमजेपीनेच करावे, असे पांडेय यांनी सांगितले, त्यास अजयसिंह यांनी सहमती दर्शवली आहे. पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर करता येतील, याबद्दल देखील एमजेपीने सूचना करावी, असे पांडेय यांनी बैठकीत सूचवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!