औरंगाबाद : पुन्हा एकदा लसींचा साठा नसल्यामुळे आता महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. गुरुवारी रात्री १५ हजार लसींचा साठा मनपास प्राप्त झाला. मात्र दोनच दिवसात हा साठा संपला. त्यामुळे लसीकरण मोहीम पुन्हा एकदा संकटात सापडली आहे.
यापूर्वी चार दिवस लस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद होते. आता पुन्हा एकदा नव्याने लसींचा पुरवठा कधी होईल, याची शाश्वती नाही.
औरंगाबाद शहरात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. अलीकडे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच पालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वेग आला होता. पालिकेने शहरात ११५ वॉर्डात जागोजागी केंद्र सुरू करून लसीकरण करण्यावर जोर दिला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींचा साठा मुबलक असल्याने ७५ ते ८० हजारापर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणाला तरूणांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने लसीचा साठा पाच दिवसातच संपला. लसींचा साठा संपल्यामुळे सोमवारपासून लसीकरण बंद पडले होते. गुरुवारी १५ हजार लसींचा साठा आला. मात्र तो दोनच दिवसात संपला. आता पुन्हा एकदा लसीकरण बंद पडले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाने एक लाख लस मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र अजूनही लस मिळालेली नसून कधी मिळेल, याची देखील शाश्वती नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारशी पंगा अंगलट ; ट्विटर विरोधात पाचवा गुन्हा दाखल
- ‘राज्य सरकार काय करतंय, तर बिल्डरांना सवलती देतंय’, भाजपचा हल्लाबोल
- …अन् आठवले म्हणाले, ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’
- ‘आयुष्य खूप सुंदर आहे…’ ; IPS अधिकारी लांडेंनी दिला युवकांना ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘मोदीजी का काम ही निराला हैं, राफेल में भी घोटाला हैं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

