Share

‘मोदीजी का काम ही निराला हैं, राफेल में भी घोटाला हैं’

Published On: 

मुंबई : फ्रान्स सरकारने भारताशी झालेल्या जवळपास ५९ हजार कोटी रुपयांच्या राफेल युद्ध विमान खरेदी करारामधील कथित भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी सुरू केलीय. यानंतर काँग्रेसने मोदी सरकारला घेरले आहे. फ्रान्सनेही राफेल व्यवहाराची चौकशी सुरू केलीय, आता तरी मोदी सरकार भारतात संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला परवानगी देणार का? असा सवाल काँग्रेसने विचारलाय.

तर दुसरीकडे राज्यातील काँग्रेस नेतेही मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केवळ दोन ओळींचे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ‘मोदीजी का काम ही निराला हैं, राफेल में भी घोटाला हैं’ असे ट्विट त्यांनी केलेय. शिवाय चोर के दाढी में राफेल असे हॅशटॅग वापरले आहे.

दरम्यान, राफेल फायटर जेटच्या व्यवहारात गौडबंगाल असून या व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली परंतु मोदी सरकारने या व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. परंतु सत्य जास्त दिवस लपत नसते आज फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली असून, मग भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करून सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!