Share

केंद्र सरकारशी पंगा अंगलट ; ट्विटर विरोधात पाचवा गुन्हा दाखल

Published On: 

नवी दिल्ली : नव्या आयटी नियमांवरून भारत सरकारबरोबर गोंधळ घालणारी मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter चा त्रास काही कमी होत नाही. आता Twitter इंडियावर आपल्या प्लॅटफॉर्मवरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीत कंपनीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. वकील आदित्य सिंद देशवाल यांनी ट्विटर इंडिया, त्याचे एमडी मनीष माहेश्वरी आणि Atheist Republic नावाच्या NGO विरूद्ध हिंदु देवीचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये FIR दाखल केली आहे.

जुलै 2011 पासून Twitter आणि Atheist Republic चा संस्थापक अर्मिन नवाबी मिळून हिंदू देवतांचा आक्षेपार्ह कन्टेन्ट दाखवत आहेत, हे Blesphemy च्या कक्षेत येतो. हिंदू धर्म आणि अन्य धर्मांबद्दल अशा blasphemous content ने Atheist Republic ची प्रोफाइल भरली आहे. परंतु Twitter ने असा कन्टेन्ट काढण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. अशाप्रकारे Twitter स्पष्टपणे भारतीय कायद्याचे उल्लंघन करीत आहे आणि त्याचा संलग्न म्हणून काम करीत आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीचं पालन न केल्यामुळे ट्विटरला असलेले कायदेविषयक संरक्षण हटवण्यात आले होते. त्यामुळे ट्विटरला मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागतोय. ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकरणात आतापर्यंत 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ट्विटरने लिगल शिल्ड गमावल्यापासून थेट ट्विटरवर हे गुन्हे दाखल होत आहेत.

यामध्ये गाझियाबाद पोलिसांनी एका मुस्लिम समुदायाच्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. नुकतंच भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात ट्विटरवर पॉक्सो कायद्यांतर्गत आणि नव्या आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!