🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी केली. दोन दशकांहून अधिक काळ असलेली युती संपुष्टात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मागील काही दिवसात चांगलाच संघर्ष वाढला आहे. शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे सर्वाधिक आमदार असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद हे थोडक्यात हुकलं असून याबाबत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या त्यावेळेच्या घडामोडींवर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य उमटलं.
‘सन्मान देवदूतांचा’ हा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला रामदास आठवले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. आठवले यांनी आपल्या खास शैलीत या कार्यक्रमात तुफान टोलेबाजी केली. एका चारोळीतून टोपेंच कौतुक केलं तर फडणवीसांना ‘त्या’ सल्ल्याची आठवण करून दिली.
नेमकं काय म्हणाले आठवले ?
‘मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका… माझं जर ते म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते,’ असं रामदास आठवले म्हणाले. यासोबतच त्यांनी तिसऱ्या पर्यायाबाबत देखील मोठं भाष्य केलं.
‘जर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं,’ असं आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला होता. तर पुढे त्यांनी कोरोना काळातील कामगिरीवर राजेश टोपे यांचं देखील तोंडभरून कौतुक केलं.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांची निवड होईलच पण ‘या’ गोष्टीची काळजी – थोरात
- ‘गोपीचंद पडळकरांना कोल्हापुरात फिरू देणार नाही’; राष्ट्रवादी आक्रमक
- ‘जहाँ हमारे नाम से आग लग जाती है!’, राऊतांचा शायरीतून वार
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी’ ; स्वप्निलच्या आईचा तळतळाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
