Share

‘आयुष्य खूप सुंदर आहे…’ ; IPS अधिकारी लांडेंनी दिला युवकांना ‘हा’ मोलाचा सल्ला

Published On: 

मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली.

पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व आणि मुख्य परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेमुळे अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया समाजातून येत आहे, स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्यांच कुटुंब दुःखात बुडालं आहे. स्वप्निलच्या मृत्यूचं वृत्त त्याची आई छाया लोणकर यांच्यासाठी मोठा आघात ठरला. या घटनेनंतर आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करत युवकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

‘केवळ नोकरीच्या परीक्षेत पराभव होणं म्हणजे अंत होत नाही. आयुष्य खूप सुंदर आणि आशावादी आहे. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा वाटतं आता आपण थकलोय. पुढे काहीच दिसत नाही. परंतु अंधारानंतर प्रकाश दिसतो. मला देखील असा अनुभव खूपदा आला आहे. हिंमत न हरता मी पुढे गेलो आणि शेवटी आज इथपर्यंत येऊन पोहचलो आहे असं त्यांनी सांगितले.

https://www.facebook.com/shivdeeplandeofficial/posts/353794989436683

तसेच जर मला कोणती सरकारी नोकरी मिळाली नसती तर मी अन्य काही रोजगार करून माझ्या कुटुंबाची जबाबदारी आनंदाने सांभाळली असती. कारण माझ्या आयुष्यावर केवळ माझा हक्क नाही. प्रत्येक पराभवातून आपल्याला ताकद घ्यायला हवी. विश्वास ठेवा, पराभवातून विजय साकारण्याच्या जिद्दीला हे जग सलाम करतं.’ अशा आशयाची भावनिक पोस्ट आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!