मुंबई : महराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांत शेतकरी, कलादिग्दर्शक व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटना एका पाठोपाठ समोर आल्यात. दुसरीकडे मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची एकही वीट अद्याप रचली गेलेली नाहीये. तरीही कंत्राटदारांला ५०० कोटी रूपये पडावेत यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या. १. प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या, २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्निल लोणकरची आत्महत्या, ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या. मात्र, राज्य सरकारची प्राथमिकता काय तर बीडीडीचाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव” असं ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय.
२एमपीएसीतील विलंबामुळे #SwapnilLonkar आत्महत्या
३ कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या
मात्र
राज्य सरकारची प्राथमिकता काय तर
BDDचाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 4, 2021
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सोलापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी मंगळवेढ्यातुन सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे. ‘काल वारकऱ्यावर कारवाई आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडी सरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील? असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी का काम ही निराला हैं, राफेल में भी घोटाला हैं’
- ‘मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी?’
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणे चुकीचे, मोगलाईतही असे झाले नव्हते’, फडणवीसांचा घणाघात
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’


