नवी दिल्ली : १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थ संकल्प सादर केला. त्यांनतर शेअर बाजाराने उसळी घेतली सेन्सेक्स १६५० अंकांनी वधारला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२०० वर पोहोचला असून निफ्टीनेही ३५० अंकांची वाढ नोंदविला होता. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सेन्सेक्स १६५० अंकांनी व निफ्टी ४७० अंकांनी वधारला होता
आज पुन्हा म्हणजे अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात दुसऱ्यांदा तेजी दिसून आली आहे. यावेळी निर्देशांकाने 51 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराने 51 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजी आहे. तसेच बँक निफ्टीने 36 हजाराचा टप्पा पार केला आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. काजाच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 417 अंकांची वाढ होत बाजार 51,031.39 वर सुरू झाला. तर निफ्टीमध्ये 57 अंकांची वाढ होत 14,952.60 वर सुरू झाला.
दरम्यान आज मध्यवर्ती बँकेने पतधोरण जाहीर केल्या नंतर व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले. यामुळे सामन्यांचा अपेक्षाभंग झाला असला तरी देखील सध्या बँकिग क्षेत्राच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. दोन बँकांच्या खासगीकरणाच्या निर्णयानेही बँकिंग क्षेत्राच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी बँक निफ्टीने 36,615.20 अंकाचा उच्चांक नोंदवला आहे. बाजारात शुक्रवारी एसबीआय, कोटक बँक, बँक ऑफ बडोदा, आयटीसी,टाटा स्टील, एमटीपीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

