Share

भाजपच्या छत्रीची कॉंग्रेस भवनात झाली दुरुस्ती, पुण्यातील उपक्रमाची राज्यभरात चर्चा

Published On: 

पुणे : पुणे शहर काँग्रेसने शहरात एक उपक्रम राबवला असून या उपक्रमाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे.पावसाला सुरुवात होताच आपण आपली जुनी छत्री शोधतो. वर्षभर पडून राहिल्याने या छत्र्या बऱ्याचदा नादुरुस्त झाल्याचं पाहायला मिळते. याच नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं. १७ जून ते १९ जून पर्यंत सकाळी ११ ते सहा या वेळात काँग्रेस भवनात नागरिकांना आपल्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन मिळणार आहेत.

https://twitter.com/anilmane111115/status/1405749812905971722?s=20

 

आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करुन दिली जाईल, असं पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे. ही फुकटची संधी सोडतील ते पुणेकर कसले? त्यामुळे काही पुणेकरही सकाळपासूनच काँग्रेस भवनच्या बाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी छत्र्या घेऊन हजर आहेत.

https://twitter.com/anilmane111115/status/1405749812905971722?s=20

https://twitter.com/Inamdari1/status/1405740334110285832?s=20

 

दरम्यान, या उपक्रमाची पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. ७० वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता भाजपाची काही धडगत नाही अशा आशयाच्या पोस्ट केल्या जात आहेत. तर काही अस्सल पुणेकर मंडळी भाजप आणि कॉंग्रेसला टोमणे मारताना दिसून येत आहेत.

 

काँग्रेसच्या विनामूल्य छत्री दुरूस्तीची समाजमाध्यमांवर बरीच टर ऊडवली जात आहे.  तर दुसऱ्या बाजूला  एका आजोबांनी भाजपच्यावतीने वाटप करण्यात आलेली छत्री देखील दुरुस्त करून घेतली आहे. हा फोटो वापरून भाजपला देखील काही प्रमाणात प्रत्युत्तर दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!