मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे. आधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस राज्यात स्वबळावर लढणार असून आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील भाजप राज्यात स्वबळावरच लढणार असल्याच जाहीर केले.
या दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष… सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.
यावर आता कॉंग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या युतीच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो हे समोर ठेवून पुढे काम करू’. असं थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी काल बैठक घेतली. मात्र कालच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीला साडे तीन वर्षे आहेत. जिथे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत तिथे फिरलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना दिल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील – निलेश राणे
- सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी १० दिवसांचा जामीन मंजूर
- उस्मानाबादेत ‘माझी पोषण परसबाग’ मोहिमेला सुरुवात
- नीति मोहनच्या गोंडस मुलाचे फोटो पाहून सेलेब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया


