Share

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय राज्यांनी घ्यावा-भारती पवार

Published On: 

पुणे : ओमायक्रॉनचा (Omicron Verint ) संसर्ग डेल्टापेक्षा अधिक आहे. लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा राज्यांनी घ्यायचा आहे. ओमायक्रॉन आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्राला जी मदत लागेल ती मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल. असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) म्हणल्या. त्या पुणे दौऱ्यावर आल्या असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात एकूण ४१५ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमासाठी भारती पवार आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारती पवार म्हणाल्या, केंद्राची पथकं ही राज्यात जाऊन माहिती घेत घेऊन ती केंद्राला कळवत आहेत. नागरिकांनी कोरोना आणि ओमायक्रॉन संदर्भात राज्यांनी दिलेले नियम पाळावेत. नियम पाळले नाहीत तर आपणचं धोका ओढवून घेत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

केंद्र सरकार देखील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट झालं असून १० राज्यात केंद्राचे पथक पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशमध्येही केंद्राची पथक जाणार आहेत. ३ ते ५ दिवस राज्यांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!