बारामती – केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार झाल्यानंतर ४३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. मात्र, यामध्ये एका नवीन खात्याचा देखील समावेश करण्यात आला. देशातील सहकार चळवळीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने केंद्रात सहकार विभाग हे नवीन खातं तयार करण्यात आलं असून त्याचा कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या सहकार साम्राज्याला नियंत्रणात आणलं जाईल, असं देखील बोललं जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच आहे. राज्याने केलेल्या सहकार कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे नवं सहकार खातं निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर गंडांतर येणार नाही. सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना काहीही अर्थ नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याने तयार केलेल्या सहकार कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळींवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही, असं सांगतानाच मल्टिस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे सहकार मंत्रालय हा विषय नवीन नाही. मी दहा वर्षे कृषी खातं सांभाळत होतो. तेव्हाही हा विषय होता. आताही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुर्देवाने महाराष्ट्रातील माध्यमांनी या खात्यामुळे राज्यातील सहकार चळवळीवर परिणाम होईल, असं भासवलं आहे. त्यात काही तथ्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

