Share

बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात काल मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप ही खाली पडले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कॉंग्रेस नेत्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

कार्यकर्त्यांसोबत बैलगाडी कोसळल्याने भाजपकडून देखील काँग्रेसची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. याला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्या पडण्याच्या व्हिडिओ इतकी उत्सुकता भाजप नेत्यांनी इतर सेवेसाठी दाखवली असती तर देशाची स्थिती अशी झाली नसती, अशा शब्दांत त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक असते तर! आज देशाची स्थिती अशी झाली नसती..’

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!