Share

Raj Thackeray | “जो प्रकल्प बाहेर पडतो तो गुजरातला जातो, मला वाटत पंतप्रधान…” ; राज ठाकरे यांचे विधान

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. यातील तीन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची तोफचं चालवली आहे. त्यामुळे विरोधक जोरदार टीका करत आहेत. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही विरोधकांच्या टीका-टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं जात आहे. यावर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान, प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. उद्या जर महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं, मात्र, वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो शेवटी गुजरातला जातो, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे, असं मला वाटतं, असं देखील राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!