Share

Jaya Bachchan | “नव्या बिना लग्नाची आई झाली तर….” ; आजी जया बच्चन यांचे वक्तव्य

Published On: 

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकदा चर्चेत असतात. सध्या जया बच्चन त्यांच्या असभ्य वर्तनामुळे काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पापाराझींसोबत सोबत त्यांचे वागणे कुणालाच आवडलेले नाही. याच कारणामुळे त्या सोशल मीडियावर टार्गेट झाल्या आहेत. पण याचा त्यांना काहीच फरक पडत नाही असे त्यांनी दाखविले आहे. कारण पुन्हा एकदा जया बच्चन यांनी असे काही वक्तव्य केले आहे की ते ऐकून लोक ‘अरे देवा’ करत बसले आहे. जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या संबंधित वक्तव्य केले आहे.

जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे वक्तव्य

जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा यांच्या रिलेशनशिप आणि लग्नावर चर्चा केली आहे. या दरम्यान, जया बच्चन म्हणाल्या की, “नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण खूप महत्त्वाचे असते.” ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट वर जया बच्चन आपली नात नव्या नवेली नंदा सोबत बोलताना म्हणाल्या की, ” नात्यांमध्ये शारीरिक संबंध खूप महत्त्वाचे असतो. पण आम्ही आमच्या काळात हे प्रयोग करू शकलो नाही. फक्त प्रेम आणि ॲडजस्टमेंट यावर नाते टिकू शकत नाही.” दरम्यान, नव्या नवेली नंदाला ‘विवाहशिवाय मूल’ झाल्यास जया बच्चन यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही असे देखील त्या म्हणाल्या.

जया बच्चन पुढे म्हणाल्या की, ” लोक माझ्या बोलण्यावर टीका करतील, पण शारीरिक आकर्षण आणि कंपटीबिलिटी खूप महत्त्वाची  आहे. आम्हाला आमच्या काळात हे करता आले नाही. पण आजकालची पिढी हे करू शकते, त्यांनी ते का नाही करायला पाहिजे? कारण ते सर्व दीर्घकालीन संबंध टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुमच्या नात्यांमध्ये शारीरिक संबंध नसेल तर तुमचे नाते फार काळ टिकू शकत नाही. मला असे वाटते की, प्रेम आणि ॲडजस्टमेंट दोन गोष्टींवर कुठलीही नाते टिकू शकत नाही.”

युवा पिढीला जया बच्चन सल्ला देत म्हणाल्या की, ” मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जिवलग मित्रा सोबत लग्न करावे. ज्याच्या सोबत तुम्ही मनमोकळ्या पणे बोलू शकता आणि त्याला म्हणू शकता की मला तुझ्याकडून एक मूल पाहिजे आणि तू मला आवडतोस. मला वाटतं तुम्ही खूप चांगले आहात. चला तर मग आपण लग्न करूया.  यादरम्यान जया बच्चन म्हणाल्या लग्न न करता तुम्हाला मूल झाले तरी माझी काही हरकत नाही.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!