Ravi Rana मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक बच्चू कडू (Bachhu Kadu) व अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात तुफान वाद सुरु आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील छावणीत सामील होण्यासाठी कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर रवी राणा यांनी माफी मागावी असे कडू म्हणाले होते. या वादात राणा आणि कडू यांनी शिंदे-भाजप सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडे हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. दरम्यान रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्याचे सांगितले आहे.
रवी राणा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलवल्यानंतर ३ साडे तीन तास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. काही विचार, भाषा न पटणारी होती त्यावर देखील चर्चा झाली. बच्चू कडू आणि मी आम्ही दोघे ही सरकारसोबत आहे. जे आमदार आहेत ते सुध्दा माझे सहकारी आहेत. गुवाहाटी संदर्भात काही वाक्य निघाले असतील तर ते मी मागे घेतो. पण ज्या पध्दतीने बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं ते न पचणारे होते. मला बच्चू कडू यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते सुध्दा त्यांचे शब्द मागे घेतील.”
राणा-कडू वाद गोड झाला?-
बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद जोरदार पेटला होता. त्यांचा वाद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यस्थी करत दोघांनाही काल वर्षा बंगल्यावर भेटायला बोलवलं होतं. या भेटीमध्ये नक्की वाद मिटला का नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे सांगितले.
रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाला सुरवात झाली. मात्र आता हा वाद एवढा वाढला होता कि मिटण्याचं नाव घेत नव्हता.
महत्वाची बातमी :
- T20 World Cup | पाकिस्तान संघ कराची विमानतळावर प्रवेश करण्यास पात्र, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
- State Govt | शिंदे गटातील ५१ आमदार-खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा तर अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत देखील वाढ
- Bacchu Kadu | इतकी बदनामी करुनही राणांवर का फिदा आहात?, बच्चू कडूंचा शिंदे सरकारला सवाल
- Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र पसरली थंडीचा हुडहुडी, तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वाढला गारठा
- Gujrat Incident | गुजरात पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

