Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ते ब्रीच कँडीत उपचार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना 2 नोहेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द
शरद पवार यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे पवारांचे पुढील सगळे कामकाज रद्द करून, पुढे ढकल्यान आले आहे. मात्र शरद पवारांना नेमकं काय झालं आहे? याची माहिती राष्ट्रवादीने दिली नाही.
शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार पुढील तीन दिवस ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणार आहेत. येत्या 2 नोव्हेंबर रोजी त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल, असं राष्ट्रवादीने सांगितलं आहे. त्याचबरोबर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी पवार शिर्डीत येणार आहेत. तसेच पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबीराला ते मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच, कुटुंबाव्यतिरिक्त शरद पवार यांना कोणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे बाकी कोणीही त्यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bacchu kadu | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादाचा अद्यापही अंत नाही? राणांच्या दिलगिरी नंतर सुद्धा बच्चू कडू म्हणाले…
- Ravi Rana | बच्चू कडू यांनी देखील शब्द मागे घ्यावे – रवी राणा
- Jaya Bachchan | “नव्या बिना लग्नाची आई झाली तर….” ; आजी जया बच्चन यांचे वक्तव्य
- Ravi Rana | गुवाहाटीसंदर्भात बोललेले शब्द मागे घेतो ; रवी राणांचा घुमजाव
- T20 World Cup | पाकिस्तान संघ कराची विमानतळावर प्रवेश करण्यास पात्र, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


