बीड: बीड जिल्ह्यातील पाली या गावी स्मशान भूमितच आपल्या पतीच्या चिते शेजारी बसलेली तारामती यांना न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग पुढाकार घेणार का हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. गेल्या महिन्यात प्रजासत्तक दिनी तारामती या पतीला अग्नि दिला होता, त्याच ठिकाणी आपल्यावर झालेल्या अन्यायसाठी आंदोलन करत बसल्या आहेत.
२० वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने तारामती साळुंखे कुटुंबाची वाडीलोपार्जित जमीन पाठ बंधारे खात्याने हस्तगत केली. मात्र त्याचा मोबदला दिला नाही. त्याप्रकरणी त्यांच्या सासू यांनी मुंबईत मंत्रालयात जात आपल्या चपला झिझवल्या मात्र न्याय मिळाला नाही. एक दिवस असाच मुंबई दौरा करण्यास त्या गेल्या असत्या त्यांचा मुंबईत अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हा लढा पुढे त्यांचे पती अर्जुन साळुंखे यांनी सुरू केला व त्यांनी सुद्धा कंटाळून शेवटी पाठ बंधारे खात्यासमोर स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले. तारामती यांना दोन मुले असून त्यांना घरात ठेऊन त्यांनी स्मशानात न्यायासाठी ठाण मांडले आहे. आता राज्य महिला आयोग, शासन, प्रशासन, जिल्ह्याचे खासदार, आमदार त्या माऊलीची दखल घेणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
- “कोहली आणि कुंबळे यांचे जमत नव्हते” ; माजी व्यवस्थापकांचा गौफ्यस्फोट
- “…मगच निर्बंध शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार”, अजित पवारांचे स्पष्टीकरण
- “ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला”, आरोपींची पोलिसांसमोर कबुली
- सचिन तेंडुलकरने केले भारतीय क्रिकेट बद्दल एक मोठे वक्तव्य …
- राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे- चंद्रकांत पाटील


