Share

सरकारी वाहनांबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Published On: 

मुंबई: पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत चालल्याने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच प्रदूषण कमी होण्यासही इलेक्ट्रिक वाहन उपयोगी पडणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्याच सोबत केंद्र आणि राज्य सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी घोषणा केली आहे.

प्रदूषणविरहित पर्यावरण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारी वाहनांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहने आता इलेक्ट्रिक असतील अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. हा निर्णय राज्य सरकारने याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी १ जानेवारी २०२० पासूनच होणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

https://twitter.com/AUThackeray/status/1477557451494940674?s=20

आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं सांगत या करिता नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून सरकारी किंवा नागरी स्थानिक संस्था तसेच कॉर्पोरेशनसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!