Share

‘…त्याच महाराष्ट्रात एक मंत्री जावयासाठी प्रेस घेतोय’, केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी आज(२ जाने.)पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच माझ्या जावयाच्या घरातून कुठलीही आक्षेपार्ह वस्तू जप्त केली गेलेली नाही. पंचनाम्यातही तसं नमूद करण्यात आलंय, असेही मलिक यावेळी म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’फक्त माझ्याच जावयाविरूध्द कारवाई का केली हा खरा ⁦नवाब मलिक यांच्या प्रश्न आहे. त्यासाठी हा सारा प्रयास, होतो आहे पत्रकारपरिषदांचा अट्टाहास. ज्या महाराष्ट्रात कन्येच्या गुणवाढीमध्ये मुख्यमंत्र्यांना जावे लागले त्याच महाराष्ट्रात एक मंत्री जावयासाठी प्रेस घेत आहे’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली असून हि क्लिप नसीबी अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा केला आहे. तसेच यावेळी बोलत असतांना मलिक म्हणाले की,’जवळपास दोन महिन्यांपूर्वी झालेल्या क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरू असून मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटेडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!