पुणे : मंत्रिपद नाकारल्यामुळे पक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत पक्ष बदलणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. असे असतांनाच आज(२ डिसें.)सावंत यांच्या घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले(Chhatrapati Sambhajiraje Bhosle) यांनी भेट दिली. त्यामुळे तानाजी सावंत आता भाजपमध्ये जाणार का?या चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. तसेच बराच वेळापासून दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याने अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सावंत यांनी मी सध्या शिवसेना पक्षात असून शिवसेनेतच राहील असे सांगितले होते. तसेच शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. कोण काय म्हणतंय तसेच काय चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही, असे देखील सावंत म्हणाले होते. परंतु संभाजीराजे सोबतच्या आजच्या भेटीनंतर तानाजी सावंत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत
- ‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’
- ‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’
- ‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

