Share

महिलांच्या ऑनलाईन बदनामी प्रकरणी नवाब मलिक लिहणार गृहमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज(२ जाने.) पत्रकार परिषदेत बोलत असतांना राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मलिक म्हणाले आहेत.

यावेळी बोलत असतांना मलिक म्हणाले की,’काही दिवसांपूर्वी सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे मुलींचे फोटे चुकीच्या पद्धतीने शेअर करण्यात आले होते. केंद्र सरकारचे समर्थक अशी काही पोर्टल चालवत असून, त्यांच्याकडून पाठराखण होत आहे.’ तसेच केंद्रीय यंत्रणांकडून जर दोषींवर कारवाई होत नसेल तर, महाराष्ट्र पोलीस कारवाई करतील, असेही मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!