🕒 1 min read
औरंगाबाद:औरंगाबाद शहरातील महिला काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही शहराध्यक्षांना पदावरुन काढण्यात आले आहे. त्यामुळे महिला काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून शहरातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडणार आहेत. प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे(Sandhya Savaalakhe) यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मात्र या नियुक्त्यांबाबत शहरातील सर्वच महिला पदाधिकारी नाराज झाल्या आहेत.
नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला महिला काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी हेमा पाटील, तर शहराध्यक्षपदी अंजली वडजे यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेत्ता डीसुझा यांनी शुक्रवारी (दि. ३१) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीला मंजुरी दिली आहे. या फेरबदलामध्ये विद्यमान शहराध्यक्ष सीमा थोरात यांना कार्यकारी कमिटी सदस्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिवपदी हेमलता पाटील, मृणाली देशपांडे, माजी शहराध्यक्ष सरोज मसलगे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
या कार्यकारी सरचिटणीस ॲड. सुनिता तायडे, सचिव मिनाक्षी बोर्डे, सचिव सईदा नबी पठाण, संगीता कांबळे यांना मात्र वगळण्यात आले आहे. या नव्या बदलांमुळे महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर नाराज झालेल्या आहेत. कुठल्या निकषांवर या निवडी करण्यात आल्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सीमा थोरात, रेखा राऊत, सरोज जेकब, दिपाली मिसाळ, सुहासिनी घोरपडे, अनिता भंडारे उपस्थित होत्या. शहरातील २५ महिला पदाधिकारी येणाऱ्या दोन दिवसात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका

