🕒 1 min read
कोरोना आणि ओमायक्रॉनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. फ्लोरोना हा कोरोना आणि इन्फ्लूएंझा (फ्लू) चा दुहेरी संसर्ग आहे. इस्रायलमध्ये संसर्गाचा हा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये शुक्रवारी कोरोनाविरुद्धच्या चौथ्या बूस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना हा डोस देण्यात येणार आहे.
इस्त्रायलमधील माध्यमांच्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी येथे कोरोनाच्या लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्यात आला होता.दरम्यान, आता ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना, येथील सरकारने कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकसंख्येला चौथ्या बूस्टर डोसची परवानगी दिली आहे. यामध्ये आता ‘फ्लोरोना’चे आता नवीन संकट आलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा कोरोना आणि इन्फ्लूएंझाचा दुहेरी संसर्ग आहे. यामध्ये एका व्यक्तीला एकाच वेळी कोरोना आणि इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण होते. दुहेरी विषाणूमुळे ते अधिक धोकादायक बनते. असा संसर्ग कोविड – १९ महामारीच्या आगमनानंतर २ वर्षांनी आढळून आला आहे.
काय आहेत लक्षणं?
डॉक्टरांच्या मते, फ्लोरोना संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये न्यूमोनिया, मायोकार्डिटिस यासारख्या आजारांची लक्षणे दिसतात. यात कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे कोरोनासारखी लक्षणेही फ्लोरोना बाधित रुग्णांमध्ये दिसतात. तसेच हृदयाच्या स्नायूमध्ये वेदना किंवा जळजळ यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. या संसर्गाबाबत जराही निष्काळजीपणा दाखवला तर तो जीवघेणा ठरू शकतो. यामुळेच इस्रायल सरकारने याबाबत विशेष अलर्ट जारी केला असून लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. इस्त्रायली सरकारने २ पावले पुढे जात कोरोना लसीकरणाच्या चौथ्या डोसवर अभ्यास सुरू केला आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या काही रुग्णांना हा डोस देण्यात देखील आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनल विजयी होईल-प्रविण दरेकर
- नववर्षात लालपरीत चैतन्य; औरंगाबादेत धावल्या १०३ बसेस, ५ हजार प्रवाशांचा प्रवास!
- नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कालीचरण महाराजांचा जयघोष; सत्ताधारी विरोधक आमने-सामने
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेवढ्या ऑक्सिजनची गरज होती त्यापेक्षा तिप्पट…- अजित पवार
- वक्फ बोर्डाची धडक कारवाई; मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा घेतला ताबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
