Share

राज्य सरकारकडून वारकऱ्यांचा छळ करून अटक, ही बाब निंदनिय: खा. इम्तियाज जलील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारचा आदेश झुगारत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारामुळे राज्य सरकारवर चौफेर टीका होत असून वारकऱ्यांमध्येही नाराजी आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा निषेध करत सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘वारकरी पंढरपूर पर्यंत २०० कि.मी. चा अंतर पायी वारी करतात ही महाराष्ट्रातील एक जुनी परंपरा आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील लोक दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाची वाट पाहतात, परंतु त्यांना सहभागी होऊ न देणे, छळ करणे आणि अटक करणे अगदी निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारचा निषेध..!’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरुन भाजपच्या वतीने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता एमआयएमने देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. राज्यातील अनेक वारकरी देखील या निर्णयामुळे नाराज झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!