Share

संजय राठोडांना राज्य सरकारची साथ ? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांचा या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

गेल्या आठवड्याभरा पासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

‘संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज काढत नाहीत. सरकार एरवी ट्वीट करतं पण आता का करत नाही? बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तर, ‘पूजा चव्हाण प्रकरणात फार काही कारवाई होईल असं वाटत नाही. नो वन किल्ड जेसिका या चित्रपटासारखी या प्रकरणाची गत होईल. हे सगळं ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने सुरु आहे. हे प्रकरण दाबण्याचा सरकार यशस्वी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय,’ अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!