Share

याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी विरोधात भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मेहबूब शेख, पूजा चव्हाण प्रकरण, वीजबिल माफी आदी विषयांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरलं असतानाच राज्य सरकारची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर, माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.तर, वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 ला संपला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही,’ असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. तर, ‘राज्य सरकार 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांशी खुला संघर्ष करत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचं काम सद्या सुरु आहे,’ असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!